
चाळीसगाव प्रतिनिधी । शहर पोलिस ठाण्यात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेत शंभर शिवप्रेमींच्या उपस्थिती साजरी करण्याचे ठरविण्यात आले आहे.

शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाचा कहर पुन्हा दिसू लागला आहे. या प्राश्वभूमीवर शिवजयंती साजरी करत असताना आता काळजी घ्यावी लागणार आहे. दहा ऐवजी शंभर जणांच्या उपस्थितीत जयंती साजरी करता येणार आहे. याबाबत सभेचे आयोजन तहसीलदार अमोल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ६ वाजे दरम्यान येथे करण्यात आले होते. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदिप देशमुख, शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड व मोठ्या संख्येने शिव भक्त उपस्थित होते. यावेळी तहसीलदार यांनी शिवजयंतीच्या दिवशी रक्तदान सारख्या शिबिरचे आयोजन करून जयंती साजरी करा असे आवाहन केले. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी यावेळी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे असे आवाहन केले आहे. शिवजयंतीच्या दिवशी पुज्य तलवार जुन्या नगर पालिका तलवार भवन येथून निघणार आहे. पुज्य तलवार धारक शिवाजी दत्तात्रेय देशमुख असणार आहे.


