Home धर्म-समाज उद्यापासून हमी भाव योजनेंतर्गत चना, हरभरा ऑनलाईन नोंदणीस होणार प्रारंभ

उद्यापासून हमी भाव योजनेंतर्गत चना, हरभरा ऑनलाईन नोंदणीस होणार प्रारंभ

0
85

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यात नाफेड मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत हमी भावाने (चना/ हरभरा ) खरेदीसाठी नाव नोंदणी सुरुवात झाली असुन , शेतकऱ्यांसाठी २०२०-२०२१ वर्षाच्या हंगामात केंद्र शासनाकडुन किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत (चना/ हरभरा) खरेदी केंद्र यावल ,उपअभिकर्ता संस्था म्हणून तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा. सहकारी संस्था मार्फत (चना/) खरेदीसाठी नावनोंदणी गुरुवार दि. १८ फेब्रुवारी  पासून सुरू होणार आहे.

शासकीय हमीभाव खालील प्रमाणे

चना/हरभरा- ५१०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आहे. शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स, पिकाचा ऑनलाईन चालु रब्बी हंगामाचा (चना/हरभरा) या पिकाचा पेरा नोंदविलेला ७/१२ उतारा तलाठी यांची स्वाक्षरी असलेला घेऊन संस्थेशी संपर्क करावा.

शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे, त्यामुळे बँक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी, अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते. शासनाच्या या हमीभाव खरेदी योजने शेतकऱ्यानी नांव नोदंणी करावी असे आवाहन परिसरातील शेतकरी बांधवांना विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन राकेश वसंत फेगडे यांनी केले आहे .

 


Protected Content

Play sound