किनगाव येथे विद्यार्थ्यांचा बसला घेराव

 

यावल,प्रतिनीधी  । किनगाव येथून सकाळी येथे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यावल आगाराचे काही बस चालक व वाहक गाडी थांबवत नाही.  याबाबत  जाब विचारल्यास चालकाने उद्धटपणे उत्तर देत असल्याने या विद्यार्थ्यांनी बसला घेराव घातला मात्र यावल आगरप्रमुख व बस स्थानक प्रमुख यांनी घटनास्थळी येऊन बस थांबविण्याचे आश्वसन दिल्यानंतर बस मार्गस्थ झाली. 

कोरोना काळात शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहे. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने शाळा, महाविद्यालय पूर्ववत सुरु करण्यात आले आहे. यातच किनगाव येथील विद्यार्थी हे साकळी येथील  अंजुमन इस्लाम उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जात असतात. आठ महिन्याच्या कालावधीनंतर शाळा, महाविद्यालय सुरु झाल्याने या विद्यार्थांनी बसची सवलतीची पास देखील काढली आहे. मात्र, यावल आगारचे काही वाहन चालाक व वाहक हे बस किनगाव स्थानकावर बस थांबवीत नसल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत. बस थांबवलीच तर ती बस स्थानक  सोडून एकतर मागे किंवा पुढे उभी करतात. यामुळे विद्यार्थ्यांना धावपळ करून बसमध्ये चढावे लागते. तसेच काही वेळेला खूप वेळ वाट पाहून देखील बस न थांबल्याने त्यांना बस स्थानकावरून घरी जावे लागते. यात विद्यार्थ्यांची काही एक चुकी नसतांना त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.  दोन दिवसांपुर्वी एका बसच्या चालकाला विद्यार्थ्यीनींनी विचारले आज बस उशीराने आली, त्यावर त्या चालकाने बसची एव्हढावेळ वाट पाहण्यापेक्षा तुम्हाला पायीच शाळेत जाता येत नव्हते का ? असा उद्धटपणे उत्तर दिले. याचा विद्यार्थीनींना राग आला व त्यांनी बसला घेराव घातला असता त्यांचे पालकही आक्रमक झालेत. हीबाब यावल आगाराचे    प्रमुख शांताराम भालेराव व बस स्थानक प्रमुख संदीप जगन्नांथ अडकमोल हे काही वेळातच किनगावला आले.  त्यांनी पालक व विद्यार्थी यांच्या तक्रारी समजुन घेत बसेस थांबण्याबाबत व सदर अर्वाच्च उत्तरे देणारा चालक यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने संतप्त जमाव शांत झाला. यावेळी संजय सयाजीराव पाटील, किनगाव खुचे सरपंच भुषण नंदन पाटील, उपसरपंच लुकुमान कलंदर तडवी, सचिन नायदे, खलील शेख, सुपडू,रविंद्र ठाकूर यांनी  पालकांना व विद्यार्थ्यांची समजूत काढत आगार प्रमुखांना विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याबाबत सांगीतले. यावेळी किरण सोनवणे मेहमूद हाजी रूस्तम,अश्पाक शहा, राजेंन्द्र पाटील, यासीन तडवी, मुक्तार मन्यार, जाहाबीर तडवी, मेहबुब पिंजारी, सबदर तडवी हानिफसर प्राचार्य साकळी व असलम ताहेर मन्यारसर इ.सह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

अन् संजय पाटील झाले आक्रमक

यावल आगाराच्या काही वाहक व चालकांनमुळे किनगाव अपडाउन करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना जो असह्य त्रास सहन करावा लागतो त्यामुळे पालकांचा व नागरिकांचा आमच्यावर रोष आहे व लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही आपणाकडे नेहमी ही कैफियत मांडत असतो. मात्र आपण याकडे अजिबात लक्ष देत नाही तरी आपण लवकर विद्यार्थ्यांचा अपडाऊन करण्याचा मार्ग सुरळीत करावा अन्यथा आम्ही आंदोलन करू असे  संजय सयाजीराव पाटील यांनी यावेळी आक्रमक झाले होते. 

Protected Content