Home आरोग्य जिल्ह्यात आज १९ कोरोना बाधित आढळले; ३४ रूग्ण झाले बरे

जिल्ह्यात आज १९ कोरोना बाधित आढळले; ३४ रूग्ण झाले बरे

0
29


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालातून जिल्ह्यात १९ बाधित रूग्ण आढळून आल्याचे दिसून आले आहे. तर आज ३४ रूग्ण बरे झाले आहे. आतापर्यंत एकुण ५५ हजार ८२३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार

जळगाव शहर- ८, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-४, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०,  जामनेर-०, रावेर-०, पारोळा-३, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-०, बोदवड-२  असे एकुण १९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ५९१ बाधित रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी ५५ हजार ८२३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ४०१ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहे. आज एकाही रूग्णा मृत्यू झालेला नाही अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.जी.चव्हाण यांनी कळविले आहे. 


Protected Content

Play sound