Home Cities यावल हंबर्डी ग्रामस्थांकडून जलसंपदामंत्री ना. पाटील यांचे केले स्वागत

हंबर्डी ग्रामस्थांकडून जलसंपदामंत्री ना. पाटील यांचे केले स्वागत

0
61

यावल प्रतिनिधी ।  तालुक्यातील हंबर्डी गावाच्या प्रमुख मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने  प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे हंबर्डी गावं पुस्तक व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अँड. रवींद्रभैय्या  पाटील फैजपूर येथे जात असतांना हंबर्डीचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार खेमचंद पाटील , तुषार पाटील , अक्षय वाघुळदे , जितेंद्र पाटील यांच्या सह  नवनिर्वाचित ग्रामपंचायात सदस्य रुपेश महाजन , उषा पाटील, अलका पाटील , यांच्या सह ग्रामस्थांनी स्वागत केले.

यावेळी त्यांना गावाचा इतिहास दर्शवित असलेले आपले हंबर्डी गाव पुस्तक लोक, लोकजीवन, धार्मिक, सामाजिक,  रीतिरिवाज, आर्थिक स्थिती स्वतंत्र चळवळीतील सहभाग, शिक्षण क्षेत्रात असलेली प्रगती यासह अन्य विषयांची माहिती सुंदर मांडण्याचा प्रयत्न समाविष्ठ केलेले पुस्तक भेट दिले .खेमचंद पाटील यांनी हंबर्डी गावाचे गयझेटिअर तयार केले आहे. यावेळी ना . जयंत पाटील यांनी तात्काळ गावाचे नांव ऐकुन  हंबर्डीकर बेकरी ची आठवण काढून हेच का ते गाव बोलून तेथे उपस्थित  सर्वामध्ये हास्य पिकवला व आपल्या पुढील प्रवासाला निघाले.

 


Protected Content

Play sound