बोराळे येथे सूक्ष्म नियोजन प्रक्रियेस सुरूवात

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बोराळे या गावात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सूक्ष्म नियोजनची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

मौजे बोराळे तालुका यावल येथे पोखरा योजनेअंतर्गत गाव  शिवारात सूक्ष्म नियोजनाचे कामाची प्रक्रिया चालू झाली असुन विकासाचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे . या निमित्ताने परिसरातीत तसेच गावातील शेतकरी बांधवांना या योजनेचे महत्त्व सांगुन मार्गदर्शन करण्यात येत असुन व लाभ घेण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. तसेच गावतील शिवार फेरी व प्रभात फेरी काढून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली .सदरील प्रकिया नियोजाचे काम कृषी  सहाय्यक, व्ही. व्ही .बारी सुहम सहा ,अमोल शिरसाठ . बोराळे गावाच्या सरपंच सौ.वंदन चौधरी ,उपसरपंच उज्जनसिंग राजपूत , ग्रामसेवक राजु तडवी , पोलीस पाटील माधुरी राजपूत , आशा वर्कर सुनैना राजपूत ,कृषी वशक आर एस निउम, बोराळे येथील प्रगतिशील  शेतकरी खिलचंद चौधरी, गणेश चौधरी संजीव सिंग राजपूत नितीन राजपूत  माजी सरपंच भारती राजपूत ,तंटामुक्ती अध्यक्ष कैलास सिंग राजपूत उमेश सिंग राजपूत अश्विनी राजपूत नंदन तायडे जिग्नेश वानखेडे प्रदीप वानखेडे गावातील ग्रामस्थ व शेतकरी बांधव व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने या प्रसंगी उपस्थित होते

 

 

Protected Content