जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील नवी दाभाडी येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी दुसर्या संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील मालदाभाडी येथीले या अल्पवयीन तरुणीने ८ फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय गोविंद चोपडे या तरुणास अटक केली होती. तर यातील दुसरा संशयित ऋषीकेश नारायण कोळी हा मात्र फरार झाला होता. यातील ऋषीकेशला बुधवारी अटक करण्यात आली असून त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. सरकार पक्षातर्फे अॅड. भारती खडसे यांनी काम पाहिले.