जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील विटनेर येथे शेताच्या बांधावरुन शेतकरी योगेश वराडे (वय ३० रा. विटनेर) या शेतकर्याची ६० हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबविल्याची घटना आज बुधवारी समोर आली आहे.
७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास योगेश वराडे हे त्यांची दुचाकी (एम.एच.१९ डी.क्यू. ४०५३) घेवून शेतात गेले होते. यावेळी त्यांनी शेताच्या बांधावर दुचाकी लावली व ते काम करण्यासाठी निघून गेले. सायंकाळी साडेसहा वाजता काम आटोपून परतले असता, शेताच्या बांधावर उभी केलेली दुचाकी आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही मिळून न आल्याने चोरीची खात्री झाल्यावर वराडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात ६० हजार रुपये किमतची दुचाकी लांबविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे