Home Cities मुक्ताईनगर आमदार चौधरी यांचा मुक्ताईनगर काँग्रेसतर्फे सत्कार

आमदार चौधरी यांचा मुक्ताईनगर काँग्रेसतर्फे सत्कार

0
22


 

मुक्ताईनगर प्रतिनिधी । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी यांचा मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे रावेर तालुक्यातील शिरोडा येथे सत्कार करण्यात आला.

आ. शिरीष चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने सोमवार ८ फेब्रुवारी रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यामध्ये जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा सचिव आसिफ खान, जिल्हा मागास सेल जिल्हा उपाध्यक्ष बी. डी. गवई, ज्येष्ठ नेते सुरेश भोलाने,  निखिल चौधरी यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

 


Protected Content

Play sound