जळगाव Jalgaon प्रतिनिधी । जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी कोविडच्या आपत्तीमुळे आपला यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
उद्या दिनांक १० फेब्रुवारी रोजी जैन उद्योग समूहाचे Jain Irrigation, Jalgaon अध्यक्ष अशोकभाऊ जैन Ashok Jain यांचा वाढदिवस आहे. दरवर्षी त्यांना स्नेही जन मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यासाठी जैन हिल्सवर येत असतात. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात येते. तथापि, यंदा त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भातील पत्र जारी केले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, वाढदिवसाला येणार्या स्नेहीजनांच्या गोतावळ्यात रमणे हे सुखकारक असते. तथापि, यंदा कोरोनाची आपत्ती असून अजूनही हे सावट दूर झालेले नाही. यामुळे या वर्षाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. अर्थात, यासाठी कुणी प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा देऊ नये असे यात सुचविण्यात आले आहे. तर आपण दूरध्वनी, भ्रमणध्वनी व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा स्वीकारणार असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.