Home आरोग्य जिल्ह्यात दिवसभरात ७८९ जणांनी घेतली कोवीशिल्ड लस – डॉ. चव्हाण

जिल्ह्यात दिवसभरात ७८९ जणांनी घेतली कोवीशिल्ड लस – डॉ. चव्हाण

0
69

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात अठरा लसीकरण केंद्रावर ७८९ जणांनी कोवीशिल्ड लस घेतली आहे. आजपर्यंत एकुण ११ हजार ४० जणांना कोवीशिल्ड लस देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन.जी. चव्हाण यांनी दिली. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि जिल्हाभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी डॉक्टर्ससह कक्षसेवक, परिचारिका, परिचारक, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी  यांनी पुढाकार घेतला आहे. सोमवारी ८ फेब्रुवारी रोजी दिवसभरात जिल्ह्यात एकुण ७८९  लसीकरण करून घेतले. 

कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशील्ड’ हि लस तयार झाली आहे. दिवसभरात डॉक्टर्ससह आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी प्रक्रियेत सहभाग घेऊन प्रक्रिया पूर्ण केली. यात जळगाव जिल्हा रूग्णालयात १०४, जामनेर-१२, चोपडा-७२, मुक्ताईनगर-४८, चाळीसगाव- ८२, पारोळा-५, भुसावळ-४२, अमळनेर-५८, पाचोरा-३२, रावेर-४९, यावल-३१, गाजरे हॉस्पीटल-८३, गोल्डसीटी हॉस्पिटल-४८, भडगाव-४५, बोदवड-१७, एरंडोल-२०, रेल्वे हॉस्पिटल भुसावळ-१९ आणि ऑर्किड हॉस्पिटल-२२ असे एकुण ७८९ जणांनी कोवीशिल्ड लस देण्यात आली.

कोरोना लसीविषयी जनसामान्यांमध्ये काहीशी भीती आहे. मात्र आरोग्य यंत्रणेचे प्रमुख अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी तसेच, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील पहिली लस घेऊन हि भीती दूर करीत आदर्श निर्माण केला आहे.  लस घेतल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना अर्धा तास निरीक्षण कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.  याठिकाणी सार्वजनिक आरोग्य परिचारिका अर्चना धिमते, अधिपरिचरिका, कर्मचारी यांनी लसीकरण प्रक्रिया राबविण्याचे यशस्वी नियोजन केले.

 


Protected Content

Play sound