राणेंचं स्वप्न आता फडणविसांना पडतय ! : मलिकांची खोचक टीका

 

मुंबई प्रतिनिधी । नारायण राणे यांना २२ वर्षांपासून मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडत असून आता हेच स्वप्न देवेंद्र फडणवीस यांना पडत असल्याची खोचक टीका मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक म्हणाले की, “राणेसाहेब 22 वर्ष फासे पलटवण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांना मुख्यमंत्री बनण्याची स्वप्नं पडत आहेत. त्यांना फासे पलटवता आलेच नाहीत, तीच देवेंद्र फडणवीस यांची अवस्था आहे. नारायण राणेंची 22 वर्ष मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पाहण्यात गेली, आता देवेंद्र यांचीही जातील” असा तिरकस निशाणा नवाब मलिक यांनी साधला. “भाजप हा प्रॉपगंडा करणारी मशिन आहे. खोट्या प्रॉपगंड्याने कुठलंही सरकार पडत नाही, सत्य उघड होतं, आम्ही अशा प्रॉपगंड्याला घाबरत नाही” असेही नवाब मलिक यांनी  सांगितले.

“दिल्लीतही 23-23 पक्षांचे सरकार होते, तेव्हा ते का बोलले नाहीत? पक्ष चाकावर चालत नसतो, भाजपची कार्यपद्धती ही फुग्यासारखी आहे, एकदा हवा गेली की पुढे जात नाही. राज्यात भाजपचा फुगा फुटला, दिल्लीतही फुटणार आहे. चाकाने सरकार चालत नाही, विचारांनी चालतं. महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. विधानसभेत, ग्राम पंचायतीत महाविकास आघाडीला स्वीकृती मिळाली, त्यांना हे कळत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रश्न निर्माण केला, तेव्हा का बोलले नाहीत? बूंद से गई तो हौद से आती नही अशी परिस्थिती आहे” असे नवाब मलिक म्हणाले.

Protected Content