पारोळा तालुक्यात दोन ठिकाणी गुरांची चोरी; पोलीसात अज्ञातांवर गुन्हा

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील आडगाव आणि तामसवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी गुरांची चोरी केल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी पारोळा पोलीसात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आला आहे. 

पहिल्या फिर्यादीनुसार, राजेंद्र तुकाराम निकम (वय-४५) रा. आडगाव ता. पारोळा  हे शेतकरी आहे. त्यांचे आडगाव शिवारात शेती आहे. जोड धंदा म्हणून त्यांच्याकडे बैलजोडीसह गायी देखील आहेत. ६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या समोर २० हजार रूपये किंमतीची गाय बांधली होती. अज्ञात चोरट्यांनी दारासमोरून गायी चोरून नेली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक आशिष चौधरी करीत आहे. 

तर दुसऱ्या फिर्यादीनुसार, यशवंत शिवाजी पाटील (वय-३४) रा. कारमाड बु ता.पारोळा हे देखील शेतकरी आहे. त्यांच्याकडे गायी व म्हशी आहे. त्यांच्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. ६ फेब्रुवारी रोजी तामसवाडी शिवारात त्यांनी ४० हजार रूपये किंमतीचे दोन गोऱ्हे बांधलेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी शेतातून दोन्ही गोऱ्हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे सकाळी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार जयवंत पाटील करीत आहे. 

Protected Content