नेरी येथील तरूणाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली; पाचोरा पोलीसात गुन्हा

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नेरी शिवारातील शेतातून एकाची दुचाकी लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, रईसखान मेहमुद खान पठाण (वय-२६) रा. नेरी ता. पाचोरा जि.जळगाव हे मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे कामासाठी (एमएच १९ डीपी ८११६) क्रमांकाची दुचाकी आहे. ५ फेब्रुवारी रोजी नेरी शिवारातील ते वडगाव येथे अनिल परशूराम पाटील यांच्या शेतासमोर दुचाकी रात्री ९ वाजता पार्किगला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आली.  आजूबाजूच्या परिसरात दुचाकीचा शोधा लावला असता दुचाकी मिळून आली नाही. याप्रकरणी पाचोरा  पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ज्ञानेश्वर पाटील करीत आहे. 

 

Protected Content