Home Cities जळगाव काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आमदार शिरीष चौधरी यांची नियुक्ती

काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आमदार शिरीष चौधरी यांची नियुक्ती

0
39


 

 

रावेर : प्रतिनिधी । यावल रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीषदादा मधुकरराव चौधरी यांची आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली यात कालच विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या सोबत पक्षाच्या अन्य प्रदेश कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचीही निवड जाहीर करण्यात आली आहे यात रावेर यावल विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीषदादा चौधरी यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे खानदेशातून यासोबत धुळे येथील आमदार कुणाल पाटील यांनाही प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.


Protected Content

Play sound