Home Cities यावल यावलला भाजपचे महावितरण विरोधात आंदोलन

यावलला भाजपचे महावितरण विरोधात आंदोलन

0
29


 

यावल : प्रतिनीधी । यावल तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथील महावितरण कार्यालयासमोर सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात आंदोलन करण्यात आले

वीज बिल न भरल्यास वीज ग्राहकांवर कारवाई करण्यात यावी असे आदेश देणाऱ्या राज्य शासनाच्या विरोधात महावितरणच्या कार्यालयास  “टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन” करण्यात आले.
या वेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष हर्षल पाटील, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा कृउबाचे माजी सभापती नारायण चौधरी, जळगाव जिल्हा बँकेंचे गणेश नेहेते, भाजपा तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जेनसिंग राजपूत, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस राकेश फेगडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी , भाजप यावल शहराध्यक्ष डॉ निलेश गडे, भाजप फैजपूर शहराध्यक्ष अनंत नेहेते, पंचायत समिती उप सभापती दीपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती उमेश पाटील, अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष, युवा मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी, हेमराज फेगडे, गोपालसिंग पाटील, किशोर कुलकर्णी, लहू पाटील, अतुल भालेराव, किशोर चौधरी, योगेश चौधरी, हेमंत चौधरी, ललीत चौधरी , स्नेहल फिरके, मनोज बारी , भूषण फेगडे, राहुल फेगडे, यावल तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात मोठया संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound