Home क्राईम जुन्या वादातून तिघांना दगड मारून शिवीगाळ व मारहाण; रामानंदनगर पोलीसात नोंद

जुन्या वादातून तिघांना दगड मारून शिवीगाळ व मारहाण; रामानंदनगर पोलीसात नोंद


जळगाव प्रतिनिधी ।  गोकुळ नगर कोळीवाडा पिंप्राळा येथील तरूणीचा दिड वर्षापुर्वीच प्रेम विवाह झाला आहे. याचा राग तेव्हापासून तरूणीच्या मामा आनंदा पांडूरंग जाधव याच्या मनात होता. त्यावरुनच कुरापत काढून मंगळवारी संध्याकाळी दिर व सासु दुचाकीने जात असतांना त्याना दगड फेकुन मारत वाद घातला. जाब विचारल्यावरुन वादाला सुरवात होवून रत्नाबाई सानेवणे यांची पोत व पर्स पळवल्याची तक्रार कांचन सोनवणे यांनी दिली आहे. 

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,कांचन सचिन सोनवणे (वय-२३) यांचे सचिन सोनवणे यांच्यासोबत दिडवर्षापुर्वी प्रेम विवाह झाला असून दोघेही आनंदाने संसार करत आहे, मात्र, कांचन यांच्या माहेरच्या मंडळींना विवाहाला विरोध असल्याने तिचे मामा आनंदा पांडूरंग जाधव यांनी कुरापत काढली. कांचन सोनवणे यांचे दिर राहुल सोनवेण आई रत्नाबाई सानवणे यांना घेवून पिंप्राळ्यातून जात असतांना कुंभार वाड्या जवळ आनंदा जाध याने दगड मारुन फेकला.तसेच शिवीगाळ करुन तुम्हाला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत हल्ला चढवला. यात रन्नाबाई व राहुल असे मायलेक किरकोळ जखमी झाले असून कांचन सोनवणे यांच्या तक्रारीवरुन आनंदा जाधव, सुनी बाळू सपकाळे, जिवन सपकाळे (सर्व रा. बौद्ध वाडा पिंप्राळा) यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस नाईक महेंद्र पाटिल करीत आहेत.

 


Protected Content

Play sound