चोरीचे सत्र रोखण्यासाठी मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्हीची गरज- पो.नि.ठाकुरवाड (व्हिडीओ)

चाळीसगाव जीवन चव्हाण । चाळीसगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीचे सत्र सुरू आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर नगरपालिकेमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

चाळीसगाव शहरात दिवसाढवळ्या चोरीचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे.  यासंदर्भात लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने चाळीसगाव शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्याशी आज चर्चा केली. तत्पूर्वी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी व अंकुश ठेवण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजे, असे संतप्त प्रतिक्रिया तमाम चाळीसगावकरांनी नोंदवली. याबाबत विचारणा केली असता नगरपालिकाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजे. शहरातील सीसीटीव्ही  कारण गुन्हेगार कुठले आहेत. हे ओळखायला सोपे जातील. व गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील असे मत ठाकुरवाड यांनी व्यक्त केला.

https://www.facebook.com/508992935887325/videos/776753129580387

 

Protected Content