भुसावळ प्रतिनिधी । बाजारपेठ पोलिस ठाण्याचे अधिकारी खोट्या गुन्ह्यात अडकवून माझ्याविरुद्ध एमपीडीएचा प्रस्ताव तयार करत असल्याचा आरोप आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी प्रांताधिकार्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केला आहे.
रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी प्रांताधिकार्यांना एक निवेदन देत पोलीस प्रशासनावर आरोप केले आहेत. यात नमूद केले आहे की, संघटीत गुन्हेगारी अथवा एमपीडीएसारखे खोटे प्रस्ताव तयार करून मला जेलमध्ये डांबण्याचा बाजारपेठ पोलिसांचा प्रयत्न आहे. माझी समाजात चांगली पत आहे, सार्वजनिक आणि सांस्कृतीक क्षेत्रात माझे योगदान आहे, पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक आता पोलिसांना हाताशी धरून कारस्थान रचत आहेत. त्यामुळे मला न्याय मिळावा अशी मागणी राजू सूर्यवंशी यांनी निवेदनात केली आहे. आतापर्यत माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी चौकशी करून न्याय द्यावा असे सूर्यवंशी यांनी सांगितले.