जळगाव प्रतिनिधी । येथील ख्यातनाम सर्जन तथा स्वामीनारायण हॉस्पीटलचे संचालक डॉ. स्नेहल फेगडे यांची ‘सर्जन्स ऑफ इंडिया’ या संस्थेच्या कार्यकारी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
‘सर्जन्स ऑफ इंडिया’ या संस्थेच्या महाराष्ट्र शाखेची निवडणूक नुकतीच पार पडली. यात स्वामीनारायण हॉस्पीटलचे संचालक डॉ. स्नेहल फेगडे यांची कार्यकारी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगर या जिल्ह्यांमधून करण्यात आलेली आहे.
डॉ. स्नेहल फेगडे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आधीच आपल्या कामाचा अमिट ठसा उमटवला असतांना आता सर्जन्स ऑफ इंडियाच्या कार्यकारी सदस्यपदी त्यांची झालेली निवड लक्षणीय मानली जात आहे. दरम्यान, आपण संघटनेच्या मजबुतीकरणासाठी प्रयत्न करणार असून जळगाव येथे राज्यस्तरीय कॉन्फरन्स घेण्याचा मानस असल्याचे डॉ. स्नेहल फेगडे यांनी नमूद केले आहे.