यावल : प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगर कठोरा गावात झालेल्या निकृष्ट कामांची चौकशी करून नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी दोषींवर कारवाई करावी आणि भ्रष्टाचार उजागर करावा अशी अपेक्षा आता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत
या गावात झालेल्या लाखो रुपयांच्या विविध कामांचा खेळखंडोबा झाला आहे निविदा अटीशर्ती व नियम धाब्यावर ठेवुन करण्यात आलेल्या कामांची वरीष्ठ पातळीवर चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे . डोंगर कठोरा या गावात मागील वर्षी १४ व्या वित्त आयोग , दलीत वस्ती सुधार योजना, रोजगार हमी योजनांच्या माध्यमातुन लाखो रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता .

दरम्यान या योजनांची कामे ग्रामपंचायत पातळीवर करण्यात आली येथे झालेली सर्व विकासकामे निकृष्ठ प्रतिची आहेत .तत्कालीन सरपंच वगळता सर्व सदस्यांची झालेली अपात्रता , प्रशासकाची नेमणुक अशा गोंधळलेल्या कारभारात संधीसाधु ठेकेदार व पंचायत समितीचे भ्रष्ट अधिकारी यांच्या
संगनमताने या कामांची वाट लावण्यात आली
आता नुकत्याच संपलेल्या निवडणुकीत नवे ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत त्यांनी या कामांची गुणवत्ता तपासावी व शासनाचे नियम धाब्याव ठेवुन निकृष्ठ कामे करणाऱ्या संबधीत ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडुन करण्यात येत आहे .


