वरणगावातील पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

वरणगाव प्रतिनिधी । शहरात गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी आज बुधवारी न. पा. मुख्याधिकारी श्यामकुमार गोसावी यांना वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवेदन देऊन करण्यात आली.

दोन दिवसापूर्वी नदी पात्रात पायी चालणाऱ्या चार ते पाच नागरिकांना या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. लहान मुले खेळत असताना तसेच पायी चालणाऱ्या आणि दुचाकीस्वराच्या अंगावर हे कुत्रे धावून जातात. कुत्रे अंगावर आल्याने नागरिक भांबऊन जातात.  बस स्थानकापासून गावात जाताना रात्री बेरात्री रामपेठ, प्रतिभा नगर कॉर्नर, नदी पात्र, मटण मार्केट, स्मशान भूमी परिसर, गांधी चौक, जुनी भाजी साथ, सावकार गल्ली, मोठी होळी, रावजी बॉ परिसर, अकसा नगर तसेच नवीन कॉलनी परिसरात कुत्र्यांचे टोडकेचे टोडके बसलेले असतात यांच्या जवडून कोणी गेल्यास त्यांच्या अंगावर चावा घेण्यासाठी धावून जातात. अशा मोकाट कुत्र्यांपासून शहरातील नागरिकांना धोखा होत आहे. या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून मानवाचे रक्षण करा अश्या  मागणीचे निवेदन शहर राष्ट्रवादीतर्फे देण्यात आले.

निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, शहराध्यक्ष संतोष माळी, तालुकाध्यक्ष दिपक मराठे, जिल्हा युवक उपाध्यक्ष वाय. आर. पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोज कोलते, माजी नगरसेवक रविंद्र सोनवणे, गणेश चौधरी, समाधान चौधरी, रिजवान शेख, एहसान अहमद, माजी नगराध्यक्ष अरुणाबाई इंगळे, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, महेश सोनवणे, जुबेर शेख, आय काँग्रेसचे शहराध्यक्ष अशपाक काजी, अझर सैय्यद, जुनेद सैय्यद, मुस्तकीन मन्यार, नरबेग इम्रानबेग, सादाब शेख, अकील सैयद, राजेश इंगळे यांच्या स्वाक्षरी आहे.

Protected Content