Home क्राईम चाळीसगाव शहरातील फुले कॉलनीत घरफोडी

चाळीसगाव शहरातील फुले कॉलनीत घरफोडी

0
51

चाळीसगाव प्रतिनिधी । बंद घरातून चाळीस हजार रोख व चांदीचे दागिने घरातून लंपास केल्याची घटना शहरातील फुले कॉलनीत आज सकाळी उघडकीस आली आहे.

याबाबत वृत्त असे की, रमेश वाल्मीक मांडूळे (वय-५४) व पद्माबाई रमेश मांडूळे (वय-५०) हे दाम्पत्य फुले कॉलनी,भडगाव रोड येथे वास्तव्यास असतात. ते रविवार रोजी सकाळी ५ वाजता बर्‍हाणपूर येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. आज सकाळी तेथून परतल्यावर घराचा कुलूप तोडून घरातील रोख चाळीस हजार रुपये व चांदीचे दागिने असे एकूण ४६००० हजार रुपयांचे मुद्देमाल लंपास केल्याचे त्यांना दिसून आले.

रमेश मांडूळे हे हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत असतात. पत्नी पद्माबाई माडुंळे हे इस्त्रीचे काम करीत असतात. ह्या दाम्पत्यांची हलाखीची परिस्थिती असून एकाप्रकारे त्यांना धक्काच बसला आहे. रमेश मांडूळे यांनी शहर पोलिस स्टेशन याबाबत तक्रार दिली असून तेथे गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound