हिरापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आत्मक्लेश आंदोलन (व्हिडीओ)

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील हिरापूर येथे रोहित्र मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.

तालुक्यातील हिरापूर येथे गेल्या दहा दिवसांपासून रोहित्र जळून होऊन सुद्धा तरी शेतकऱ्यांना रोहित्र मिळत नाही. रोहित्रा त्वरीत बसवावी अशी मागणी दररोज केली जात आहे. ही मागणी पुर्ण होण्यासाठी आधी ८० टक्के विज बिल भरा तरच रोहित्र मिळेल. असे उत्तर महावितरणकडून दिले जात आहे. याला कंटाळून आज २३ जानेवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत हिरापूर येथील रोहित्रजवळ आत्मक्‍लेश आंदोलन केले. आत्मक्लेश आंदोलनाचे वेळी विठोबा पाटील, मोतीलाल पाटील, जितेंद्र पाटील, भैय्या पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. शाखा अभियंता निसार तडवी यांनी दोन दिवसात रोहित्र मिळेल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Protected Content