सतीश जैन यांना रत्नागिरी येथील युवा साहित्‍य रत्न पुरस्कार जाहीर

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे नाशिक व जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष सतीश जैन यांनी मराठी साहित्यीक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल त्नागिरी येथील  युवा साहित्य मंडळाचा ‘युवा साहित्‍य रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

गेल्या तीस वर्षांपासून मराठी साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेले साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सुर्योदय सर्वसमावेशक मंडळाचे जळगाव व नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष यांना रत्नागिरी येथील  युवा साहित्य  मंडळाचा साहित्य चळवळीच्या  कार्याबद्दल ‘युवा साहित्य रत्न’  पुरस्कार जाहीर  करण्यात  आला.  रोख  रक्कम, गौरवपत्र  असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार साहित्य क्षेत्रात कार्य करण्यासाठी  ज्यांनी  ज्यांनी मला बळ  दिले त्या सर्व ज्येष्ठ  श्रेष्ठ मान्यवरांना  समर्पित असल्याचे माहिती सतीश जैन यांनी बोलतांना सांगितले. सतीश जैन यांचे  याबद्दल संघपती दलुभाऊ जैन यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक  मान्यवरांनी अभिनंदन  केले आहे.

 

Protected Content