भुसावळ प्रतिनिधी- येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर जयेश दुधानि या तरुणावर रात्री प्राणघातक चाकू हल्ला झाल्यमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, भारतीय जनता पार्टीचा पेज प्रमुख सम्मेलन ९:०० वाजेच्या दरम्यान झाल्यानंतर रात्री ११:२० मिनीटांच्या सुमारास दोन ते तीन संशयितांनी जयेश दुधानी या तरुणावर प्राणघातक हल्ला केला आहे. शहर पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ.संजय पाटील व सोबत काही पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन जखमींवर उपचारासाठी गोदावरी हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले असून जखमीं बोलण्याच्या परिस्थितीत नसल्याने प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
भुसावळात तरुणावर चाकू हल्ला
6 years ago
No Comments