Home धर्म-समाज न्हावी येथे दुचाकीची चोरी करणारा अटकेत; फैजपूर पोलीसात गुन्हा

न्हावी येथे दुचाकीची चोरी करणारा अटकेत; फैजपूर पोलीसात गुन्हा


फैजपूर प्रतिनिधी । येथून जवळ असलेलया न्हावी गावातून तरूणाची दुचाकीची चोरी करणाऱ्या चोरट्यांस फैजपूर पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, रोहित नरेंद्र चौधरी (वय-२८) रा. न्हावी ता. यावल हे खासगी नोकरी आहे. कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ सीए १२९९ ) क्रमांकाची दुचाकी आहे. ११ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता त्यांनी दुचाकी घरासमोर पार्किंग करून लावली होती. गावातील संशयित चोरटा किरण चुडामण भराडी (वय-२२) याने दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी किरण भराडी याच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीसांनी पोहेकॉ देविदास सुरदास यांनी आरोपीस अटक केली.


Protected Content

Play sound