मुंबई प्रतिनिधी । धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची तटस्थपणे चौकशी करण्यात येत असून यात सत्य काय ते समोर येणार असल्याचे नमूद करत नवाब मलिक यांनी त्यांची पाठराखण केली आहे.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरूणीने शोषणाचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी भाजपने केली आहे. भाजपच्या महिला आघाडीने तर आक्रमक पवित्र्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमिवर, कामगार मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांची पाठराख केली आहे.
याबाबत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवाब मलिक यांनी पाठराख केली आहे. यात ते म्हणाले की, आरोप तर होतच राहतात. जे आरोप करतात त्यांना तसा अधिकारही आहे. पण विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. राज्य सरकारवर कोणताही दबाव नाही. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर या प्रकरणांमधील सत्य बाहेर येईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले.