Home क्राईम तांबापूरा येथे घरफोडीत २५ हजाराची रोकड लांबविली

तांबापूरा येथे घरफोडीत २५ हजाराची रोकड लांबविली


जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापूरा भागातील बिस्मील्ला चौकात असलेल्या घरातून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रूपये रोख व इतर वस्तू चोरून नेल्याचे सोमवारी पहाटे उघडकीला आले. याप्रकरणी सोमवारी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील तांबापूरा भागात मोहसीन शेख सलीम (वय-२४) रा. बिस्मील्ला चौक, तांबापूरा हे आपल्या कुटुंबियासह राहतात. त्यांचे दुमजली इमारत आहे. १० जानेवारी रोजी रात्री १० वाजता घरातील कुटुंबिय जेवण करून खालच्या घरात झोपले. अज्ञात चोरट्यांनी वरच्या घरात शिरून घरात ठेवलेले २५ हजार रूपयांची रोकड आणि हॅन्ड बॅग, केबलचे बुक चोरून नेल्याचे ११ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी सोमवारी रात्री उशीरा पर्यंत पोलीसात नोंद नव्हती. मोहसीन शेख सलीम यांच्या फिर्यादीवरून ११ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ईम्रान सैय्यद करीत आहे


Protected Content

Play sound