Home आरोग्य ऐनपुर येथे ग्रा.पं.निवडणुकीसाठी दोन उमेदवार कोरोना पोझिटीव्ह

ऐनपुर येथे ग्रा.पं.निवडणुकीसाठी दोन उमेदवार कोरोना पोझिटीव्ह


रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील ऐनपुर ग्रामपंचायत निवडणूकीचे दोन उमेदवार कोरोना पोझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रावेर तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणूकीचा प्रचार अंतीम टप्यात असतांना आज तालुक्यातील ऐनपुर येथील दोन उमेदवार कोरोना पोझिटीव्ह आले आहे. सुरक्षा म्हणून दोघेही उमेदवारांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला शेवटचे दोन दिवस राहिले आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवार विलगिकरण असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीवर काय परिणाम होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.


Protected Content

Play sound