यावल प्रतिनिधी । येथील तालुक्यातील मनवेल ग्रामपंचायतच्या सार्वत्रीक निवडणुकीत ९ जागा पैकी ३ उमेदवार बिनविरोध निवडुन आले असुन ६ जांगाकरीता १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.
येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये ३ जांगाकरीता दहा उमेदवार रींगणात आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये दोन जागा बिनविरोध आल्या आहे. त्यात सौ.देवयानी पुरुषोत्तम कोळी व विकास रुपसिंग पाटील बिनविरोध निवडून आले आहे तर एका जागेकरीता सरळ लढत होत आहे. तर प्रभाग क्रमांक १ मध्ये अलका छगन पाटील बिनविरोध निवड झाली आहे. एक जागा बिनविरोध आली आहे. दोन जांगाकरीता ५ उमेदवार रिंगणात आहे.
४ जानेवारी २०२१ रोजी माघारीच्या दिवशी एकाही उमेदवाराने माघार घेतली नसल्यामुळे दुपारी तीन वाजता उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. मनवेल येथील ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक एक मध्ये सर्वाधिक ७०३ मतदान असुन ३७१ पुरुष व ३३२ स्रीया आहे वार्ड क्रमांक २ मध्ये २२९ पुरुष तर २५४ स्रीया असून ५५३ मतदार आहे तर वार्ड क्रमांक ३ मध्ये ३५२ पुरुष व ३१४ स्रीया असुन ६६६ मतदार असुन एकुन १९२२ मतदार आहे. सरपंच आरक्षण निवडणूकी नंतर निघणार असल्यामुळे निवडणूकीचा जोर वाढला आहे. ९ सदस्य संख्या असुन ५ महीला व ४ पुरुष निवडुन येणार असल्यामुळे सरपंच आरक्षणाची सर्वाना प्रतिक्षा लागली आहे.