डॉ.आचार्य विद्यालयात शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ.अविनाश आचार्य विद्यालयात ‘रंगतरंग’ शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धा दि. ६ जानेवारी, बुधवार रोजी उत्साहात संपन्न झाल्या.

विवेकानंद प्रतिष्ठानच्या कोश्याध्यक्षा व शालेय समिती प्रमुख हेमाताई अमळकर यांच्याहस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका योगीता शिंपी, वाहन विभाग प्रमुख मिलिंद पुराणिक, शैलजा पप्पू, किरण सोहळे यांची उपस्थिती होती. या क्रीडा स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे यात “पारंपारिक” खेळ घेण्यात आले. शिक्षकांमधील एकाग्रता व कल्पकता वाढावी, समन्वय साधता यावा, त्यांच्यातील कौशल्य विकास व्हावा या हेतूने स्पर्धेचे आयोजन केले गेले. वैयक्तिक खेळात भोवरा फिरवणे, चौकट उड्या, सागरगोट्या, टायर फिरविणे, गोट्या गोट्या या स्पर्धा झाल्या तर सांघिक खेळात सोनसाखळी, लगोरी, विटी दांडू, आंधळी कोशिंबीर, चौकट चौकट इ. पारंपारिक खेळांचा समावेश होता. क्रीडा स्पर्धेसाठी केतन वाघ यांनी नियोजन केले तसेच सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/421643398886851

Protected Content