Home Cities मुक्ताईनगर कर्की ग्रामपंचायत बिनविरोध; फडकला भाजपचा झेंडा !

कर्की ग्रामपंचायत बिनविरोध; फडकला भाजपचा झेंडा !

0
70

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील कर्की येथील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून सर्वच्या सर्व उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचेच अविरोध निवडून आल्याने येथे भाजपचा झेंडा फडकला आहे.

तालुक्यातील कर्की येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप व्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने उमेदवारीसाठी अर्ज दाखल न केल्यामुळे कर्की ग्रामपंचायत निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध होऊन भाजपचे सर्व सदस्य विजयी झाले आहेत. याप्रसंगी कर्की येथे डॉ राजेंद्र फडके,भाजपा नेते अशोक कांडेलकर यांनी ,सर्व नवनिर्वाचित बिनविरोध निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांची भेट घेतली व त्यांच्या नेतृत्त्वात बिनविरोध मिळविलेल्या विजयाचा आनंद व्यक्त केला.

यावेळी भाजपा यु. मो.विधानसभा क्षेत्र प्रमुख व सदस्य दत्ता गणेश पाटील, अरुण पाटील, विकास कोळी, गोकुळ महाजन, युवराज पानपाटील, शेरसिंग भिलाले, मधुकर लोंढू कोळी, पांडुरंग चिंधु बोदडे, योगेश राजाराम पाटील ,आदी सदस्य ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले आहेत. या वेळी विनायक पाटील,सुकलाल मिस्तरी, ईश्वर मिस्तरी, वल्लभ चौधरी उपस्थित होते.


Protected Content

Play sound