शिवसेनेला धक्का : बोदवड तालुका प्रमुखांचे बंधू भाजपात

 

 

f0e28003 cc9c 46d5 8992 4357dadf5869

 

बोदवड (प्रतिनिधी) येथील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते व तालुकाप्रमुखाचे बंधू शामराव खोडके यांनी आज माजी महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी आ. खडसे यांनी खोडके यांच्या गळ्यात भारतीय जनता पक्षाचा मफलर घालून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले व आगामी निवडणूकीमध्ये जोमाने पक्षाचे काम करण्याच्या सूचना केल्या.

यावेळी खोडके म्हणाले की, आ. खडसे यांनी नेहमी सर्व समाजातील घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात त्यांनी जाती पातीचा कधीही भेदभाव केला नाही, तालुक्याच्या विकासासाठी आ.खडसे झटत आहेत. त्यांच्या या कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास ठेवुन आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहोत. आगामी काळात आणखी समर्थकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश करू.
एकिकडे शिवसेना जिल्हाप्रमुख आ. खडसे आणि खा. रक्षाताई खडसे यांना विरोध करत असताना दुसरीकडे गेल्या आठवड्यापासून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भाजपा प्रवेशाचे सत्र सुरूच आहे. यातून आ. खडसे यांच्या नेतृत्वावरील असलेला आणखी दृढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.

याप्रसंगी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विलासभा ऊ धायडे, जिल्हा चिटणीस कैलासभाऊ चौधरी, राजुभाऊ माळी,विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेशजी ढोले,भाजपा बोदवड तालुकाध्यक्ष भागवत भाऊ टिकारे, भाजप मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दशरथभाऊ कांडेलकर,माजी जि प सदस्य अनिलजी खंडेलवाल, जिल्हा दुध संघ संचालक मधुकरजी राणे, बाजार समिती संचालक रामदासजी पाटील ,समन्वय समिती अध्यक्ष अनिल पाटील, अनिलभाऊ वराडे,चंद्रकांतभाऊ भोलाने, बोदवड भाजप शहराध्यक्ष किरणजी वंजारी, भा ज यु मो तालुकाध्यक्ष विनोद चौधरी, सईदजी बागवान, सुनिलजी काटे, रवीभाऊ खेवलकर, कल्पेश शर्मा भगतसिंग पाटील सुधीर पाटील ,उज्वल खाचने उपस्थित होते

Add Comment

Protected Content