मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. त्यांनी उद्यापर्यंत वेळ मागून घेतली असतांना एक दिवस आधीच त्या चौकशीसाठी उपस्थित झाल्या आहेत.
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. यावेळी त्यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागून घेतला होता. त्यांच्या विनंतीनुसार ईडीने त्यांना ५ जानेवारी रोजी उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र आज दुपारी त्या ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या आहेत.