Home Cities जळगाव आव्हाने येथील शाळेत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

आव्हाने येथील शाळेत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाने येथील समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

शासनाच्या आदेशानुसार सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा महिलां शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिवशी भाषण स्पर्धा, निबंधस्पर्धा, परिसंवाद स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या शाळेतील विद्यार्थी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी विद्यार्थीचे कौतुक केले, शाळेच्या मुख्याध्यापक हर्षाली पाटील व वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शननुसार स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या शिक्षक जयश्री पाटील, चैताली पाटील दीपमाला बाविस्कर, प्रज्ञा बाविस्कर, सद्द्दाम तडवी, पवन पाटील यांचे सहकार्य मिळाले.


Protected Content

Play sound