आता प्रभाग समितीच्या बळकटीकरणाचे लक्ष्य ! : उपमहापौर खडके (Video)

जळगाव प्रतिनिधी । उपमहापौर सुनील खडके यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आता या समस्यांचे निराकरण करतांनाच प्रभाग समित्यांचे बळकटीकरण करण्यास आपले प्राधान्य असून हाच आपला नवीन वर्षाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन उपमहापौर सुनील खडके यांनी केले आहे. लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सुनील खडके म्हणाले की, मी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याचे निराकरण करण्याला आपले प्राधान्य राहणार आहे. यासाठी अधिकार्‍यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

दरम्यान, या पुढील काळात आपण प्रभाग समितीच्या बळकटीकरणाला प्राधान्य देणार असल्याची माहिती सुनील खडके यांनी दिली. ते म्हणाले की, आपण प्रत्येक प्रभाग समितीत जाऊन बसून त्यांच्या समस्या सोडविणार आहोत. दरम्यान, प्रत्येक वॉर्डासाठी ५० लाख रूपयांचा निधी मिळाला असल्याने शहरातील विकासकामे मार्गी लागणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर, नागरिकांनी कोरोना पूर्णपणे नष्ट होईपर्यंत शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

खालील व्हिडीओत पहा उपमहापौर सुनील खडके नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1048440102289952

Protected Content