Home धर्म-समाज जोगलखेडा येथील बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचा आमदारांकडुन सत्कार

जोगलखेडा येथील बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांचा आमदारांकडुन सत्कार

0
41


 

पारोळा, प्रतिनिधी । तालुक्यातील जोगलखेडा ग्रामपंचायतीच्या ७ पैकी ६ व खेडी खु.प्र.ज.ता.अमळनेर येथील १ सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा आमदार चिमणराव पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.

पारोळा तालुक्यातील जोगलखेडा येथील ७ जागांपैकी ६ जागांवर प्रत्येकी एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केल्यामुळे ६ जागांवर बिनविरोध सदस्यांची निवड झाल्याचे निवडणुक अधिकारी यांनी जाहीर केले. बिनविरोध निवडुन आलेल्या महाविकास आघाडीचे वर्षा अनिल पाटील, सुनंदाबाई भरत पाटील, रमाबाई भानुसिंग पाटील, सायलाबाई साहेबराव पाटील, सुनिता संदिप पाटील, शालिनी किशोर पाटील असे ६ सदस्य तसेच खेडी खु.प्र.ज.ता.अमळनेर येथील बिनविरोध निवड झालेल्या हिरालाल पवार यांचे आमदार चिमणराव पाटील यांनी सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी गणेश पाटील, भागवत पाटील, जिजाबराव पाटील, सुपडु पाटील, बंडु पाटील, बुधा पाटील, संभाजी पाटील, युवराज पाटील, नाना पाटील, नवल पाटील आदी. उपस्थित होते.


Protected Content

Play sound