जळगाव, प्रतिनिधी । शहरातील पोलन पेठ फ्रुट गल्लीतील रस्त्यावरील वीज खांब मागील महिन्याभरापासून वाकलेल्या स्थितीत उभा असून हा खांब पडून मोठी दुर्घटना घडू शकते, याकडे संबधितांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक व व्यापारी करीत आहेत.
शहरातील पोलन पेठ परिसर व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. हा परिसर नेहमीच खरेदीसाठी गजबजलेला असतो. या परिसरात मागील २५-३० दिवसांपासून शिवाजी रोड फ्रुट गल्लीच्या रस्त्यामध्ये असलेल्या एका वीज खांबाला रात्री एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यात हा खांब वाकला आहे. या वाकलेल्या खांबापासून रहदारी सुरु असते. या वाकलेल्या खांबापासून पायदळ चालणारे, वाहनचालक यांची नेहमीच वर्दळ असते. दुर्दैवाने हा खांब पडून जीवितहानी होऊ शकते. याकडे संबधितांनी लक्ष देऊन हा खांब काढून येथे नवीन खांब बसवावा अशी मागणी होत आहे. महावितरणचे कर्मचारी हे केवळ पाहणी करून गेले असून पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची तक्रार येथील व्यापारी करीत आहेत.
https://www.facebook.com/508992935887325/videos/194470489010280