Home Cities जळगाव विठोबा नगरातून विद्यूत मोटारची चोरी; शनीपेठेत गुन्हा

विठोबा नगरातून विद्यूत मोटारची चोरी; शनीपेठेत गुन्हा


जळगाव प्रतिनिधी । शनीपेठ हद्दीतील विठोबा नगरातून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पाण्याची मोटार चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, गजानन अशोक बागुल (वय-३१) रा. विठोबा नगर, गिताई बिल्डींगच्या मागे जळगाव हे व्यापारीचे काम करतात. त्यांच्या घराच्या अंगणात ओट्याखाली पिण्याचे पाणी भरण्यासाठी विद्यूत मोटार बसविली आहे. २९ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता सर्वजण झोपले असता अज्ञात चोरट्यांनी अंगणातून विद्यूत पंपची मोटार पीव्हीसी पाईप कापून चोरून नेली. ३० डिसेंबर रोजी सकाळी ७ मोटार चोरीस गेल्याचे उघडकीला आले आहे. गजानन बागूल यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेंद्र बागुले करीत आहे.


Protected Content

Play sound