Home Cities जळगाव जि.प.च्या मुदत संपलेल्या १८ गाळे करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाचे नियोजन

जि.प.च्या मुदत संपलेल्या १८ गाळे करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाचे नियोजन

0
106


जळगाव प्रतिनिधी । शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकातील जिल्हा परिषदेच्या मुदत संपलेल्या १८ गाळे धारकांना थकित भाडे भरण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे नोटीस पाठविण्यात आली असून आत पोलीस बंदोबस्तात २ जानेवारी रोजी गाळे खाली करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी दिली.

शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकातील जिल्हा परिषद अल्पबचन भवनात असलेले १८ गाळे हे जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहे. या गाळ्यांची २२ मार्च २०१८ रोजी मुदत संपली होती. मुदत संपल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने गाळे खाली करून दुकानाचे भाडे देण्यासाठी नोटीसही दिली होती. त्यानंतर तोंडी व लेखी माहितीही देण्यात आली. दरम्यान आता कोणताही करार अस्तित्वात नसल्याने बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवण्यात आलेल्या दुकाने सोडावे असे नोटीसीत नमूदही केले होते. यासाठी जिल्हा परिषदेने पाठविलेल्या नोटीसाच्या विरोधात सर्व गाळेधारक जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान १७ जुलै २०१९ रोजी न्यायालयाने निकाल देवून कायदेशिररित्या मार्गाने गाळे ताब्यात घेण्याचे आदेश केले आहे. बेकायदेशीर दुकाने ताब्यात ठेवून  आणि करार संपल्यापासून आजपर्यंतचा ५ पट दंडासह एकुण १ कोटी ८३ लाख ६८ हजार ४७३ रूपयांचा दंड ठोठावला आहे. २५ डिसेंबर रोजी नोटीस बजावण्यात आल्यानंतर आता पोलीसांच्या मदतीने नियमाप्रमाणे सर्व कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी.एन. पाटील यांनी दिली.


Protected Content

Play sound