ए.टी.झांबरे विद्यालयात ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त विविध स्पर्धा

जळगाव प्रतिनिधी ।  के.सी.ई.सोसायटीच्या ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात ऊर्जा संवर्धन सप्ताहा निमित्त ” वकृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे सोमवार २८ डिसेंबर रोजी बक्षिस वितरण महाऊर्जाचे व्यवस्थापक एस.एम.गांधेले यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी होते. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा  यांच्या वतीने शाळेत “ऊर्जा क्लब” स्थापन करण्यात आला. ८ ते १५ डिसेंबर या काळात ऊर्जा संवर्धन सप्ताह” साजरा करण्यात आला .”  दैनंदिन जीवनात उर्जेची बचत” या विषयावर निबंध , वकृत्व आणि चित्रकला स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी च्या गटात आणि इयत्ता आठवी ते दहावी च्या गटात घेण्यात आल्या. सर्व स्पर्धा़चे परीक्षण प्रतिभा लोहार ,ए.एन.पाटील, डी.बी.चौधरी, पी.आर.राणे. ,सतिश भोळे, यांनी केले . ऊर्जा क्लबचे समन्वयक  महेंद्र नेमाडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन आणि आभार केले.

 

 

 

 

 

 

Protected Content