Home Cities जळगाव मनसे जनहित कक्ष जिल्हा उपाध्यक्षपदी अविनाश पाटील

मनसे जनहित कक्ष जिल्हा उपाध्यक्षपदी अविनाश पाटील

0
23

 

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी अविनाश भास्कर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस तथा जनहित कक्ष व विधी विभाग अध्यक्ष अॅड. किशोर शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार अविनाश पाटील यांची नियुक्ती केली आहे. अविनाश पाटील यांना धुळे येथील बैठकीत नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी अॅड. किशोर शिंदे, जळगाव जिल्हा सचिव अॅड. जमीलभाई देशपांडे, प्रदेश अध्यक्ष धीरज देसले व धुळे यथील मनसे पदाधिकारी उपस्थित होते. अविनाश पाटील यांचे नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound