यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अट्रावल येथे एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अट्रावल येथील ३० वर्षीय विवाहितेने या प्रकरणी फिर्याद दिली होती. त्या नुसार १३ जुलै रोजी गावातील रिंकू विनायक उर्फ आनंदा तायडे, विक्की मारोती तायडे यांच्यासह अन्य एकाने विवाहितेच्या घरासमोरच्या ओट्यावर बांधलेली गॅलरी तोडून टाकतो असे बोलून वाद घातला. विवाहितेच्या पतीने विचारणा केल्याचा राग येवून तिघांनी विवाहितेचा पती, सासरे यांना शिवीगाळ व मारहाण केली. लोखंडी रॉडने जिवेे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला तसेच विवाहितेचा विनयभंग केला. या प्रकरणी पोलिसांत विनयभंगासह जिवे ठार मारण्याचा प्रयत्न अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून संशयित आरोपी विक्की तायडे हा पोलिसांना गुंगारा देत होता. संशयित गावात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली. त्यानुसार शनिवारी सापळा रचून उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार व पथकाने त्यास ताब्यात घेतले.