चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरात 22 आणि 23 मार्च या दोन दिवसीय दरवर्षीप्रमाणे पिर मुसा कादरी बाबा उरुसाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आज शहरातून चाळीसगाव पोलीस दलातर्फे रूट मार्च काढण्यात आला.
यावेळी रूट मार्चमध्ये 2 पोलीस निरीक्षक, 5 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 154 पोलीस कर्मचारी, 12 महिला पोलिस कर्मचारी, एक प्लॅटून तसेच 20 होमगार्ड असा बंदोबस्तासह वॉकीटॉकी आणि दुर्बिणीसह बंदोबस्त लावाण्यात उरूसात लावण्यात आला आहे. दरम्यान आज अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव व उपविभागीय पोलिस अधिकारी नजीर शेख यांनी बंदोबस्त बाबत मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना देण्यात आल्यात. तसेच जळगाव येथून सीआरपीएफचे प्लॅटून तसेच वरील बंदोबस्तासह चाळीसगाव शहरातून तसेच संवेदनशील भागात रूप मार्च घेण्यात आले.
पहा । चाळीसगाव शहरातील संवेदनशील परीसरात शक्तीप्रदर्शन