Home Cities धरणगाव शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याने पी.एम.पाटील यांचा ‘मातोश्री’वर सत्कार

शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याने पी.एम.पाटील यांचा ‘मातोश्री’वर सत्कार


 

 

2d46410d 6cb5 400e b9ae 4dd4b8b6e65c

 

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी पी.एम. पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कारकरण्यात आला. ते येथील न.पा.चे माजी नगराध्यक्ष तथा पदमश्री भवरलाल जैन तालुका वाचनालयाचे अध्यक्ष आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शिफारसीने नियुक्ती करण्यात आली आहे.

 

याशिवाय जळगाव ग्रामीणचे संपर्कप्रमुख महेश खैरनार यांची मुबंई उपशहर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल, बेलापूर मुबंई विधानसभा संघटनापदी सौ. रंजना महेश खैरनार यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.या प्रसंगी जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख संजय सावंत, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार अनिल देसाई, रावसाहेब पाटील, जि.प.सदस्य पप्पू सोनवणे, राजु चव्हाण, शिवसेनेचे बरेच नेते व पदाधिकारी उपस्थीत होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound