Home राजकीय आमदार अनिल गोटेंनी २६ वर्षांनंतर घेतली शरद पवारांची भेट

आमदार अनिल गोटेंनी २६ वर्षांनंतर घेतली शरद पवारांची भेट


sharad pawar anil gote

धुळे (प्रतिनिधी) राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. धुळे मतदार संघातून आपण निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आपणास संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंचा पराभव करायचा आहे. यासाठी ज्यांची मदत घ्यायची आहे, त्यांची मदत घेणार, असे धुळ्यातील भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी यांनी पवारांची भेट घेतल्यानंतर सांगितले. दरम्यान, तब्बल २६ वर्षांनंतर पवार-गोटे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

 

एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले शरद पवार आणि अनिल गोटे यांची तब्बल २६ वर्षांनी भेट झाली. लोकसभेसाठी धुळे मतदार संघातून निवडणूक लढविण्याची घोषणा करीत भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा स्वपक्षाविरुध्द बंडाचा झेंडा फडकविला आहे. त्या अनुषंगाने पवार यांच्याशी त्यांनी चर्चा केली. आ. गोटे यांनी शरद पवारांवर नेहमीच टिकास्त्र सोडले आहे. गोटे आणि पवार यांच्यातील वाकयुद्ध सर्वज्ञात आहे. २६ वर्षांनी हे दोन्ही नेते एकत्र पाहायला मिळाले. तेलगी प्रकरणानंतर गोटे आणि पवार यांच्यातील संघर्ष वाढला होता. शरद पवार यांनी आघाडीत धुळ्याची जागा काँग्रेसकडे असून आम्ही आघाडी धर्म मोडणार नसल्याचे त्यांना सांगितले असल्याचे कळते. तर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी पवार हे चर्चा करणार असल्याची माहिती गोटे यांनी दिल्याचे निकटवर्तीयांनी म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound