जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील एका भागात राहणारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या आई-वडीलांसह राहते. बुधवारी १६ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दुध घेण्यासाठी किराणा दुकावर जात असल्याचे अल्पवयीन मुलगी घरच्यांना सांगून गली होती. सायंकाळपर्यंत मुलगी घरी आली नाही म्हणून तिच्या नातेवाईकांना तिचा शोध घेतला. मैत्रिण व नातेवाईकांकडेही मिळून आली नाही. दरम्यान मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील करीत आहे.