भजे गल्लीतील अतिक्रमण काढण्यासाठी अखेर लाभला मुहूर्त ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । बस स्थानकाच्या बाजूला असणार्‍या भजे गल्लीतील अतिक्रमण काढण्यासाठी अखेर मुहूर्त लाभला असून आज उपायुक्त संतोष वाहुळे यांनी या भागाला प्रत्यक्ष भेऊ देऊन हातगाडीधारकांना निर्वाणीचा इशारा दिला.

बस स्थानकाच्या बाजूला असणारा भजे गल्लीचा भाग हा अतिशय वर्दळीचा असून अतिक्रमणामुळे रहदारीला अडचण येत असते. यातच येथील अनेक हातगाड्यांवर रात्री सर्रात दारूड्यांची गर्दी देखील असते. यामुळे अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची मागणी कधीपासूनच करण्यात येत होती. याला आता महापालिका प्रशासनाने गांभिर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने उपायुक्त संतोष वाहुळे यांनी आज हातगाडीधारकांना इशारा दिला.

यामुळे येथील अतिक्रमण काढण्यात येणार असून कायम स्वरूपी सामग्री जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अर्थात, गुरूवारी सकाळी दहा वाजेपासून अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे त्यांनी आज सांगितले.

खाली पहा याबाबतचा व्हिडीओ वृत्तांत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/409269683719382

Protected Content