Home Cities चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यातील अजून एक जवानाला वीर मरण

चाळीसगाव तालुक्यातील अजून एक जवानाला वीर मरण


चाळीसगाव दिलीप घोरपडे । तालुक्यातील पिंपळगाव येथील यश देशमुख नंतर आता पुन्हा त्याच तालुक्यातील वाकडी येथील अमित साहेबराव पाटील या जवानाला काश्मिरातील हिमवृष्टीत जखमी झाल्यानंतर हौतात्म्य प्राप्त झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, काही दिवसांपूर्वीच चाळीसगाव तालुक्यातील यश देशमुख हा जवान दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत हुतात्मा झाला होता. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यानंतर आता चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथी अमित साहेबराव पाटील (वय-३२) या सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफमध्ये कार्यरत असणार्‍या जवानाला हौतात्म्य प्राप्त झाले आहे.

अमित पाटील हे सीमारेषेवर कर्तव्यावर असतांना तुफान हिमवृष्टीत अडकून जखमी झाले होते. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू होत असतांनाच आज सकाळी त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. जवानाच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे. अमित पाटील शहिद झाल्याचे कळताच वाकडी गावावर शोककळा परसरली आहे. शहीद जवान यांचे पार्थिव आज रात्री जम्मू काश्मिर येथून घेण्यात येणार असून उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


Protected Content

Play sound